21 C
New York

Prakash Ambedkar : अमोल कीर्तिकर भाजपात जाणार; आंबेडकरांचा मोठा दावा

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यात मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर मतदान होणार आहे. मुंबईत सहा जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा त्यांनी केला.

आंबेडकर हे मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. या मतदारसंघात वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारादरम्यान हा दावा केला होता. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणुक आहे. मात्र, निवडणुकीचा तमाशा आपण पाहत आहोत. वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात, म्हणजे सत्ता आपल्या कुटुंबाबाहेर जाता कामा नये, यासाठी सगळी धडपड सुरू आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. या मतदारसंघात दिखाव्याचे नाटक सुरू असून यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ठाण्यात फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ते म्हणाले, शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीबरोबर युती झाली आहे, असं सर्व प्रचारसंभांमध्ये सांगितलं जातं. मात्र, मुंबईतील महाविकास आघाडीच्या एकाही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) एकही कार्यकर्ता दिसत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते या तमाशात सहभागी असतील, असा टोला आंबेडकरांनी लगावला.

Prakash Ambedkar काँग्रेसच्या मतदारांनी कीर्तिकरांना मतदान का करावे?

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे अमोल कीर्तिकर हेही उमेदवार आहेत. मात्र, या निवडणुकीत अमोल कीर्तिकर हे निवडणुकीनंतर १०० टक्के भाजपसोबत जाणार आहेत. असं असतांना काँग्रेसच्या मतदारांनी त्यांना मतदान का करावे? असा सवाल आंबेडकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या घटत्या टक्केवारीवरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. 2014 आणि 2019 मध्ये 70 ते 72 टक्के मतदान झालं होतं. मात्र आता मतदान 50 ते 60 टक्क्यांवर मतदान आलं आहे. या कमी झालेल्या मतदानाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष 400 पार नव्हे तर अडीचशे पर्यंत जागा जिंकेल, असं देखील आंबेडकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img