26 C
New York

Lokshabha Election : पाचव्या टप्प्यात 227 कोट्याधीश निवडणुकीच्या रिंगणात

Published:

देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. (Lokshabha Election) चार टप्प्यातील मतदान पार (Indian Elections 2024) पडले आहे. आता पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्मने पाचव्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले आहे. या टप्प्यात एकूण 695 मेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

Lokshabha Election पाचव्या टप्प्यात 227 कोट्याधीश रिंगणात

एडीआरने केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की पाचव्या टप्प्यात एकूण 159 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 227 उमेदवार कोट्याधीश आहेत. 695 उमेदवारांपैकी 33 टक्के म्हणजेच 227 उमेदवार कोट्याधीश आहेत. एआयएमआयएमच्या चार उमेदवारांपैकी दोन उमेदवार करोडपती आहेत. प्रतिज्ञापत्रात या उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती घोषित केली आहे. पाचव्या टप्प्यातील प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी 3.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन उमेदवारांची सरासरी संपत्ती 56.64 कोटी रुपये आहे.

Lokshabha Election 5 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे 83 उमेदवार

पाचव्या टप्प्यात 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असणारे 86 उमेदवार आहेत. 2 कोटी ते 5 कोटींपर्यंत संपत्ती असणारे 73 उमेदवार आहेत. 50 लाख ते 2 कोटींपर्यंत संपत्ती असणारे 162 उमेदवार आहेत. 10 लाख ते 50 लाखा दरम्यान संपत्ती असणारे 175 उमेदवार आहेत तर 10 लाखांपेक्षा कमी संपत्ती असणारे 199 उमेदवार रिंगणात आहेत.

पाचव्या टप्प्यात सर्वाधिक संपत्ती घोषित करणारे उमेदवार अनुराग शर्मा आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील झाशी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शर्मा यांच्याकडे एकूण 212 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांभरे आहेत. महाराष्ट्रातील भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या सांभरे यांनी त्यांच्याकडे एकूण 116 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 भाजपसाठी जळगावमध्ये मोठी कसोटी?

Lokshabha Election 396 उमेदवार ग्रॅज्यूएट, 26 जण डिप्लोमाधारक

उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दाही नेहमीच चर्चेत असतो. पाचव्या टप्प्यात 296 उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावी दरम्यान झाले आहे. तर 396 उमेदवारांनी त्यांचे शिक्षण पदवी आणि त्यापुढे झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 26 उमेदवार डिप्लोमा धारक आहेत तर पाच उमेदवार मात्र अडाणी आहेत. उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दाही निवडणुकीत चर्चेत असतो.

Lokshabha Election पाचव्या टप्प्यात फक्त 86 महिला उमेदवार

उमेदवारांच्या वयाचा विचार केला तर 207 उमेदवारांचे वय 25 ते 40 दरम्यान आहे. 384 उमेदवारांचे वय 41ते 60 च्या दरम्यान आहे. 103 उमेदवारांचे वय 61 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहे. महिला उमेदवारांच्या संख्येचा विचार केला तर पाचव्या टप्प्यात फक्त 12 टक्के म्हणजेच 82 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजेच यंदाही महिला उमेदवारांची संख्या कमीच दिसत आहे.
मंत्री पियूष गोयल 110 कोटींचे मालक

तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल आहेत. गोयल उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे एकूण ११० कोटी रुपयांची संपत्ती आहे. एक उमेदवार असाही आहे ज्याने आपली संपत्ती शून्य घोषित केली आहे. तर तीन उमेदवारांनी अनुक्रमे ६७ रुपये, ७०० रुपये आणि ५४२७ रुपये संपत्ती घोषित केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img