21 C
New York

Pm Narendra Modi : तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाहीत? मोदी म्हणाले

Published:

आजचे माध्यम पूर्वीसारखे राहिले नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. दरम्यान, देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. देशातील कानाकोपऱ्यात एनडीएचे उमेदवारांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसलीयं. एका दिवसांत ते अनेक जाहीर सभांना हजर राहुन संबोधित करत आहेत. अशातच माध्यमांबाबत पंतप्रधान मोदी यांनी तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाहीत? असा सवाल करण्यात आला त्यावर मोदींनी उत्तर दिलंय.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्या माध्यमांचा वापर एका विशिष्ट प्रकारे केला जात आहे. मला त्या मार्गावर जायचं नाही. आजचे माध्यम आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पूर्वी, मी आजतकशी बोलायचो, पण आता प्रेक्षकांना कळलंय की मी कोणाशी बोलतोय. आज मीडिया ही एक वेगळी संस्था राहिलेली नसून माध्यमांनीही स्वत:ची भूमिका भूमिका बनवली असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांचा पवार, ठाकरेंवर हल्लाबोल

Pm Narendra Modi मी लोकार्पणाचे फोटो काढून भवनात लावू शकतो

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी कधीच मुलाखती घेण्यास नकार दिलेला नाही, जरी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेत बदल केला तरीही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असल्याचं मोदींनी यावेळी बोलताना अधोरेखित केलंय. दरम्यान, मला देशाच्या विकासासाठी अनेक परिश्रम करावे लागत आहे, मी लोकार्पणाचे फोटो काढून भवनात लावू शकतो पण मी तसं करीत नाही. विविध राज्यांच्या जिल्ह्यांत जाऊन मी योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. माध्यमांना जर संस्कृती योग्य वाटत असेल तर माध्यमांनी ती योग्यरित्या मांडली पाहिजे, असंही मत मोदींनी व्यक्त केलंय.

या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मला पाहिले तर ते मला आजतकवर पाहतील, असंही मोदी मिश्किलपणे म्हणाले आहेत. पूर्वीचे माध्यम हेच संवादाचे साधन होते, पण आता संवादाची नवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत, याकडे त्यांनी बोलताना लक्ष वेधलं आहे. तसेच आज जर तुम्हाला लोकांशी बोलायचे असेल तर संवाद हा दुतर्फा आहे. आज प्रसारमाध्यमांशिवायही जनता आपला आवाज पोहोचवू शकते. ज्याला उत्तर द्यायचे आहे तो देखील मीडियाशिवाय आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो, असं मत मोदींनी व्यक्त केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img