राज्याच्या राजकारणात आज शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलेलं वक्तव्य खास चर्चेत आहेत. शरद पवार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते त्या हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे Sunil Tatkare येऊन गेले असं ते म्हणाले होते. माझी भेट झाली नाही पण आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर सुनील तटकरे यांनी पलटवार तर केलाच शिवाय शरद पवारांच्या पीएने काय सांगितलं याचा खुलासाही केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांतील धुसफूस अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांबाबत छगन भुजबळांशी चर्चा झाली. त्यांनीही माहिती घेतली. या दोन्ही मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असा विश्वास वाटतो, असे तटकरे म्हणाले. यानंतर नाशिकमध्ये आपण शरद पवारांची भेट घेतल्याचे अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. खरंच अशी भेट झाली होती का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाहीत? मोदी म्हणाले
त्यावर तटकरे म्हणाले, पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज न निघाल्याने वैफल्यग्रस्त आणि निराश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत तुतारीचा आवाज कुठेच झाला नसल्याने ही सर्व मंडळी वैफल्यग्रस्त झाली आहेत. एकेकाळी अनिल देशमुख सुद्धा आमच्यासोबत येणार होते. भाजपने नकार दिला म्हणून ते तेथेच राहिले.
अनिल देशमुखांनी माझ्याकडून जे सहकार्य झालं त्याची जाणीव ठेवत वक्तव्य केलं असतं तर बरं झालं असतं. माझी आणि शरद पवारांची तसेच माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण नाही. मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो होतो. तिथे मीटिंग होती. पण वॉशरुमची व्यवस्था नव्हती. मग कार्यकर्त्याला विचारलं. त्यानंतर एका हॉटेलमध्ये गेलो तिथे गेल्यावर काही वेळ थांबलो. पण सुदैवाने एक गोष्ट घडली. तिथे हेमंत टकलेंसोबत पक्ष कार्यालयात काम करणारा दत्ता नावाचा व्यक्ती भेटला तो मला ओळखणारा निघाला.
त्याने मला जी माहिती दिली ती अत्यंत महत्वाची आहे. त्याला शरद पवार साहेबांच्या पीएने फोन करून सांगितलं की माझ्याविरोधात मतदान करा. त्याने त्याला उत्तर दिलं की माझ्या गावात तीन किलोमीटर स्ट्रीटलाईन आदिती ताई आणि तटकरे साहेबांनी दिली. माझ्या गावाचा विकास त्यांनी केलाय. माझं तर सोडाच पण माझ्या भागातलं 95 टक्के मतदान त्यांनाच होणार आहे. मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान होणार आहे. त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्त भावना आणि अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीने केला जाणारा प्रचार थांबवावा. खोटेपणाचा कळस कसा असू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझ्याबद्दल अनिल देशमुखांनी केलेलं विधान आहे असे तटकरे म्हणाले.