आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC/HSC Result) परीक्षा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन केलं जातं. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा होतात. मात्र यंदा दोन्ही परीक्षाचा निकाल कधी लागतो यावर लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत सर्वांना हुरहूर लागली आहे. अशातच याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे. येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो.
यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेशाचा अर्ज उद्यापासून भरता येणार
दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर करु शकतात. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. त्यामुळे आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
यंदा महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
1 ते 26 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.