3.6 C
New York

Lok Sabha : राहुल गांधींसाठी सोनियांची जनतेला भावनिक साद

Published:

देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha) सुरू आहेत. ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी रायबरेली येथील सभेत जनतेला भावनिक आवाहन केलं. मी माझा मुलगा तुम्हाला सोपवत आहे, त्याला आपलं माना, तो तुम्हाला नाराज करणार नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

Lok Sabha आमच्या कुटुंबाची मुळे या मातीशी गेली 100 वर्षे जोडलेली

रायबरेली मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांची सभा आयोजित केली होती. या सभेत बोलतांना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही मला 20 वर्षे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठीही माझे घर आहे. माझ्या आयुष्यातील गोड आठवणीच या जागेशी जोडलेल्या नाहीत, तर आमच्या कुटुंबाची मुळे या मातीशी गेली 100 वर्षे जोडलेली आहेत.

देशमुखांच्या वक्तव्यावर तटकरेंचे प्रतिउत्तर

Lok Sabha राहुल तुम्हाला निराश करणार नाही…

सोनिया गांधी पुढं बोलतांना म्हणाल्या की, इंदिराजींच्या मनात रायबरेलीविषयी वेगळं स्थान होतं. त्यांच्या मनात तुमच्याविषयी लगाव होता. मी प्रियंका आणि राहुल यांना कायम सर्वांचा आदर करायला, कमजोर लोकांचं रक्षण करायला आणि अन्याया विरोधात लढायला शिकवलं. तुमच्या प्रेमाने मला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझे जे काही आहे, ते तुम्ही दिलेलं आहे. आज मी माझा मुलगा तुम्हाला सोपवत आहे. जसं तुम्ही मला आपलं मानलं, तसं राहुलला आपलं माना. राहुल तुम्हाला निराश करणार नाही, असं भावनिक आवाहन सोनिया गांधींनी केलं. आज खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी मनापासून तुमचा ऋणी आहे. माझे मस्तक तुमच्यापुढे श्रद्धेने झुकले आहे, असंही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img