नुकताच रिलीझ झालेल्या ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ (Heeramandi: The Diamond Bazaar) या वेब सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली. संजय लीला भन्साळी (Sanjayleela Bhansali) दिग्दर्शित ‘हिरामंडी’ (Heeramandi) प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या वेब सिरीजसाठी भन्साळींनी प्रत्येक महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अत्यंत विचारपूर्वक कलाकारांची निवड केली आहे. यासीरिजमध्ये अभिनेता फरदीन खानने तब्बल 14 वर्षांनंतर कमबॅक केलंय. अभिनेता शेखर सुमनने (Shekhar Suman) या वेब सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. मल्लिकाजानची भूमिका साकारणारी अभिनेत्री मनिषा कोईरालासोबतचा शेखर सुमनचा हा इंटिमेट सीन होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेखरने या सीनविषयी भाष्य केले. शेखर सुमन म्हणाला,”सीनविषयी घरी पत्नीला काहीच बोलू शकलो नाही आणि पाहण्यास देखील सांगितलं नाही.”
शेखरने सांगितलं की, “प्रेक्षक हळूहळू त्या सीनमधील अर्थ समजत आहेत आणि त्याचा ते स्वीकारही करत आहेत. नवाबची व्यथा त्या सीनमध्ये दडलेली आहे. त्याला परिस्थितीनुसार वागणूक दिली जाते, ती परिस्थिती काही प्रमाणात ब्रिटीशांनी आणि काही प्रमाणात तवायफांनी निर्माण केली आहे. या दोघांमध्ये नवाब अडकला आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.
‘इमरजन्सी’ चित्रपट रिलीझ होणार का नाही?
त्या सीनबद्दल पत्नीला काहीच सांगू शकलो नाही, असंदेखील शेखर म्हणाला. “जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा पत्नीने सीनबाबत विचारले परंतु मी काही व्यक्त करू शकलो नाही. तेव्हा मी तिला म्हटलं की ते सांगण्यालायक नाही आणि करून दाखवण्यालायकसुद्धा अजिबात नाही. तू तो सीन थेट सीरिज प्रदर्शित झाल्यावरच बघ”, असं तो पुढे म्हणाला.
१ मे रोजी संजय लीला भन्साळींची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून भन्साळी या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने, गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हिरामंडी’ची कथा अत्यंत रंजक आहे. हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. त्याकाळी राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी कोठ्यावर पहायला मिळायच्या. अध्ययन सुमन, शेखर सुमन, मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत.