3.8 C
New York

Raj Thackeray : शिवतीर्थावर राज यांची गर्जना नऊ मिनिटात….

Published:

महायुतीची आज मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती हे या सभेचं विशेष विशिष्ट्य होतं. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचा उल्लेख केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचं कौतुक केलं.

Raj Thackeray देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं

महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.

शिवतीर्थावरून फडणवीस ठाकरेंवर बरसले

“मोदी तुम्ही अनेकदा मुंबईत आलात. पण २१ वर्षावर आपण शिवतीर्थावर आलात. मला आठवतंय त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आला होता. आणि २०१४ला आपण कमळ बाहेर काढलं. मी फार वेळ बोलणार नाही. मोदींचं भाषण ऐकायचं आहे. तीन टप्प्यात बोलणार आहे. एक टप्पा झाला आहे. पहिला टप्पा होता. मोदींची पाच वर्ष. त्यावर बोलायचं ते २०१९मध्ये बोलून गेलो. आता गेली पाच वर्ष. मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा शिंदे सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर वेळ घालवला. जे सत्तेत येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलत नाही. काही आवश्यकता नाहीये त्यांची. अनेक योजना आहेत. ज्या पाच वर्षात झाल्या नाहीत. मी सभेत म्हटलं टिकेच्यावेळी टीका प्रशंसेच्या वेळी प्रशंसा”, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray ‘याला धाडसी निर्णय म्हणतात’

“राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवली. त्यांनी ट्रिपल तलाक हा कायदा रद्द केला. देशातील सर्व मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण झालं. रात्री नवरा आला शुद्धीत आला बेशुद्धीत आहे माहीत नाही. तलाक तलाक बोलला तर करायचं काय पुढे., पण मोदींनी कायदाच रद्द केला. याला धाडसी निर्णय म्हणतात. इतकी वर्ष जी गोष्ट झाली नाही. ती केली ही मोठी गोष्ट आहे. मोदीजी पुढच्या पाच वर्षासाठी मी तुमच्यापाठी उभा आहे. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला त्या बोलून दाखवायच्या आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img