रमेश औताडे, मुंबई
निसर्ग हा माणसाचा गुरू आहे, कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी क्रिया आहे. या हेतूने शिक्षणाचा पाया म्हणून कलाशिक्षणाकडे पाहिले पाहिजे असे मत कुलगुरु डॉ. राजनीश कामत (Rajnish Kamat) यांनी मुंबई जहांगीर आर्ट गॅलरीत मल्लिकार्जुन सिंदगी यांच्या होरायझन चित्रप्रदर्शन उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुलांना कला निर्मितीसाठी मुक्ताविष्काराची तसेच नवनवीन विशेषतः आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा सायन्स फॉर डायव्हर्सिटी आदी अभ्यासक्रमाचे शिक्षण देते. या विद्यापीठातील पांच कोर्सेस विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाणार आहेत. यापुढे रुचिसंपन्न रसिक व सौंदर्यदृष्टी असलेले प्रतिभावान विद्यार्थी या शिक्षणातून यापुढे तयार होणार असून स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार हाच समाज आणि राष्ट्र घडवणारी शक्ती निर्माण करणार आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजनीश कामत यांनी केले.
संगणकाची इंजिने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कलाकृती तयार करतात. तथापि, त्यापैकी सर्व किंवा बहुतेक आता प्रायोगिक आहेत आणि ते नजीकच्या भविष्यात कसे बाहेर येईल हे आशादायक दिसते आहे. जरी हे तंत्रज्ञान अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तरीही शक्यता अनंत आहेत. तरुणांनी याचा अवलंब करून आपल्यातला कलाकार बाहेर काढला पाहिजे असे त्यांनी सांगितले . कलाशिक्षक मुकुंद वेताळ यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.