लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी आज महाप्रचारासाठी सांगता सभा होणार असून महायुतीची दादर येथील शिवाजपार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendramodi)आणि राज ठाकरे (Raj thackeray)यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभा पार पडणार आहे. यावर “आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाज बोलवण्यात आले”. असं म्हणत मोदींसह राज ठाकरेंवर संजय राऊत Sanjay Raut यांनी टीका केली.
Sanjay Raut ‘राज ठाकरेंचे दुकान बंद होणार’
शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्यावर टिका केली. ज्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही अशी वक्तव्य केली त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन ते आज बसणार आहेत. हे महाराष्ट्रातली जनता पाहाणार आहे. मात्र 4 जून नंतर महाराष्ट्रातली काही दुकानं कायमची बंद होणार आहेत. त्या पैकी एक दुकान हे राज ठाकरेंच्या सुपारीचं दुकान आहे अशी बोचरी टिका राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut मोदी, अमित शहांनाही केले लक्ष्य
यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लक्ष्य केले आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयां विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना जवळ केले गेले नाही. आता मोदी राज ठाकरेंबरोबर दिसणार आहेत अशी टिका राऊत यांनी केली. शिवाय मोदींना महाराष्ट्रात येवढ्या सभा का घ्याव्या लागत आहेत असा प्रश्नही त्यांनी केला. देशात सध्या मोदी आणि शहा यांच्या विरोधात लाट आहे असे ही ते म्हणाले.
‘सांगली’साठी नकाराचं कारण कदमांनी सांगितलंच..
Sanjay Raut राज ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधानांसोबत एकत्रितपणे सभा होणार आहे.त्यावर,”या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत.त्यातील राज ठाकरेंचं एक दुकानं आहे. तीन-चार सुपारी शोप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत. महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ठामपणे कोणी तरी सांगितलं होतं आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासियत आहे” अशा शब्दात राज ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.
दरम्यान, “महाराष्ट्रामध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संतापाची लाट आहे. या दोघांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ढोंगी आणि भंपकपणा विरोधात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रात भाजपचे नुकसान हे देवेंद्र फडणवीसांमुळेच होत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांचा तिरस्कार करत आहे हे सगळ्यांना ४ जूनला समजेल.”असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.