23.1 C
New York

Pune Crime : पुण्यात तरुणाचा कोयत्याने खून

Published:

पुणे

मतदान होताच पुण्यात पुन्हा गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यात (Pune Crime) कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे.

कोथरुड येथील डहाणूकर कॉलनीत काल रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीनु बिसलावत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकमेकाकडे बघण्यावरुन आणि पूर्व वैमनस्यातून खून केल्याची घटना घडली आहे. अलंकार पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या चार टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img