3.6 C
New York

Narendra Modi : विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात मुंबईचं मोठं योगदान – मोदी

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha election) राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाने सभा गाजवली. यावेळी त्यांनी विकसित भारताचं व्हिजन मुंबईकरांसमोर ठेवलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात मुंबईचं मोठं योगदान राहिलं आहे. त्या मुंबईचं स्वप्न घेऊन आलो आहे. 2014 मध्ये आपली अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती ती 5 व्या स्थावर आणण्याचं काम केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई ही स्वप्ननगरी आहे. देशाला विकसित बनवण्यासाठी मुंबईचं खूप मोठं योगदान असणार आहे. मुंबईचे लोक वेगाचं महत्त्व अधिक जाणतात. आपण आतापर्यंत विकसित का होऊ शकलो नाही, आपल्यात काय कमी होती? पण आतापर्यंतच्या सरकारने आपल्या देशातील लोकांना कमी समजलं. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंडीत नेहरुंवर निशाणा साधला त्यांच्या भाषणाचा उल्लेख केला. आधीच्या पंतप्रधानांनी लाल किल्यावरून आपल्या देशातील लोकांना आळशी म्हणून संबोधलं असल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img