10.4 C
New York

Narendra Modi : मोदीच विकसित गती देणार- पियुष गोयल

Published:

मुंबई

देशाने ठरवले आहे येणाऱ्या कालावधीत भारत अमृत काळात प्रवेश करत आहे. त्या काळात आपल्याला देशाला विकसित भारत, समृद्ध देश बनवायचा आहे. विकसित भारताला हिंमतीने, इमानदारीने, आत्मविश्वासाने आणि जनतेच्या समर्थनाने गती देऊ शकतील तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच (Narendra Modi) आहेत, असे विधान उत्तर मुंबईचे (North Mumbai Loksabha) महायुतीचे उमेदवार पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मेळाव्यात केले.

कांदिवली येथे पियुष गोयल यांच्या समर्थनार्थ गुरुवारी उत्तर मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उमेदवार पियुष गोयल, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर, रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, हौसिंग फेडरेशनचे विजय शेलार, सुहास भोईटे, सारिका सावळ, डॉ. डी. एन. महाजन, व्यंकटेश सामंत, भाजपा चित्रपट आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परुळेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पियुष गोयल म्हणाले की, ही निवडणूक साधी नाही, तर देशाचे भाग्य बदलणारी आहे. १० वर्षाच्या परिश्रमात भारताने नवीन ध्येय गाठले, अर्थव्यवस्था मजबूत झाली, १० वर्षात प्रत्येक भारतीय नागरिकाचा सन्मान वाढला, स्त्री शक्तीचा आदर वाढला, तरुण-तरुणींना अमाप संधी मिळाली, गरिबांचे कल्याण झाले, २५ कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले, शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याची संधी मिळाली. एकप्रकारे बहुमुखी विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात झाल्याचे गोयल म्हणाले.

तसेच देश आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते ज्यांनी लोकांचे हृदय आपल्या कामाने जिंकलेय, ज्यांनी मोदी है तो मुमकिन है हे सिद्ध केलेय. तुम्ही २०१४, २०१९ ला मजबूत सरकार दिलात तसे २०२४ च्या या निवडणुकीत देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, देशातील स्त्री शक्तीला सन्मान देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया. पंतप्रधान मोदींच्या झोळीत ४०० जागा देऊन भारत एक विश्व शक्ती, विश्व गुरु देश बनण्यासाठी तयार आहे, हा संदेश जगाला देऊया, असेही गोयल म्हणाले.

तत्पूर्वी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले की, गेली ६०-६५ वर्ष काँग्रेसने सहकार क्षेत्रात आपले आयुष्य घालवले पण कधीही सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला नाही. तो निर्णय २०२१ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. देशात सहकार खात्याला पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमित शहा यांनी सहकार मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्वात आधी देशभरातील सगळ्या संस्था कॉम्प्युटराईज केल्या. याचा विचार काँग्रेसने कधीच केला नाही. २०२३ ला नेस्कोच्या मैदानावर कार्यक्रम झाला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक विषयांवर लोकांच्या मागण्या आल्या. गेल्या वर्षभरात आमच्या सरकारने यातील बरेचसे निर्णय मार्गी लावले. पियुष गोयल हे केंद्रातील मंत्री आहेत. त्यांनी देशात, महाराष्ट्रात विकास आणण्याचा प्रयत्न केलाय. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. जशी राम मंदिरासाठी आपल्या गावातून वीट गेलीय तसेच लोकसभेचा खासदार आपला पाहिजे ही भावना घेऊन जास्तीत जास्त मतदान करा आणि जेवढे जास्त मतदान कराल तेवढ्या जास्त मतांनी पियुष गोयल निवडून येतील, असेही मंत्री सावे म्हणाले.

तर आ. प्रविण दरेकर म्हणाले की, मुंबईतील गृहनिर्माण संस्थांचे जे विषय आहेत ते अत्यंत संवेदनशीलतेने मी पाहतो. खऱ्या अर्थाने मुंबईतील गृहनिर्माण आणि सहकार चळवळीला ताकद कोणी दिली असेल तर ती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मुंबईतील ९५ टक्के मतदान हे गृहनिर्माण सोसायटीमध्ये असते. अशी एकही व्यक्ति नाही जिचा गृहनिर्माण संस्थांशी संबंध नाही. सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी हे त्या सोसायटीतील सुख-दुःख समजत असतो. एकवेळ राज्य चालवणे सोपे आहे पण सोसायटी चालवणे अवघड असते. लोकांसाठी कामं करणारे बांधव, भगिनी येथे जमलेत. त्यामुळे त्यांच्या मताला किंमत आहे. जो सगळ्यांची काळजी घेतो त्यालाच जर आपण बोलावले नाही, साद घातली नाही तर मोदींच्या समर्थनासाठी आम्ही वणवण भटकतोय ते सार्थ होणार नाही. गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न आम्हाला माहित आहेत आणि ते सोडविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केलाय.

आम्ही जे आपल्याकडे मागणार आहोत ते चांगल्या कामासाठी मागणार आहोत. ज्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचे नावलौकिक जगाच्या पाठीवर उंचावले त्या नेत्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला निमंत्रित केले आहे. देशाचे नेतृत्व सक्षमपणे कोण करू शकतो तर नरेंद्र मोदींशिवाय दुसरा माणूस दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी पर्याय होऊ शकतात का? देश संकटात असताना, गर्मी वाढली की परदेशात जाणारी ही लोकं देशाचे नेतृत्व करू शकतील का? हा देश माझा परिवार, कुटुंब मानून पंतप्रधान मोदी तपस्वीपणे कामं करत असल्याचेही दरेकर म्हणाले.

विरोधक आमच्यावर टीका करताहेत मोदी महाराष्ट्रात सभा घेताहेत, एवढ्या वेळेला आले. तुम्ही तरुण असून तुम्हाला जमत नाही. आज पंतप्रधान न थकता देशासाठी उन्हात वणवण भटकत आहेत. नागरिकांनी मला या देशाचा १० वर्ष पंतप्रधान बनवले आहे. जनतेच्या दरबारात गेले पाहिजे, मी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे, ही भुमिका घेऊन शेकडोच्या संख्येने मोदी सभा घेताना दिसताहेत. असा व्यक्ति, नेता काही काळानंतर आपल्याला लाभला असेल तर त्याच्या मागे उभे राहणे ही आपल्यासारख्या सुशिक्षित नागरिकांची जबाबदारी आहे, असेही दरेकरांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img