8.8 C
New York

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

Published:

बीड

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा आंदोलनाची हाक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे. 4 जून पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी घोषित केले आहे. सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्या दरम्यान अचानक त्यांचे प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातील अधिक माहिती बातमी लिहीपर्यंत मिळालेले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img