8.9 C
New York

Kangana Ranaut: ‘इमरजन्सी’ चित्रपट रिलीझ होणार का नाही?

Published:

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगना रनौत (Kangana Ranaut) चांगलीच चर्चेत आली आहे. कंगणाचा ‘इमरजन्सी’ (Emergency) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. मात्र सातत्याने या चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली. अशातच पुन्हा एकदा रिलीझ डेट पुढे ढकल्याची बातमी आहे.

ही माहिती निर्मात्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. या पोस्ट लिहिलं आहे की “सध्या क्वीन कंगना सध्या तिच्या देशाप्रती असलेलं प्रेम, कर्तव्य आणि बांधिलकी या गोष्टींना प्राधान्य देत आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित ‘इमरजन्सी’ चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात येत आहे. लवकरच आम्ही नवीन डेट जाहीर करू. तुम्ही दिलेला प्रतिसादाबदल आम्ही आभारी आहोत.”


चित्रपटाची रिलीझ डेट अनेकवेळा बदलली आहे. हा चित्रपट १४ जुने २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कंगना सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याकारणामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अशातच हा चित्रपट काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाला भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. त्यामुळे तर ‘या चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढाळण्यात येत आहे का?’ असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.


या चित्रपटात कंगना रनौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिने फक्त मुख्य भूमिका साकारली नाही तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरी देखील सांभाळी आहे. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण झळकणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img