7.6 C
New York

Ghatkopar Hoarding: होर्डिंग दुर्घटनेत अभिनेत्याच्या मामा-मामीचा मृत्यू

Published:

१३ मे रोजी मुंबईतील घाटकोपरमध्ये (Ghatkopar Hoarding) वादळी वाऱ्यामुळे एक होर्डिंग पडले होते. या दुर्घटनेत होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मामा-मामीचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aryan) मामा-मामी मृत पावल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घाटकोपर दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे एक होर्डिंग पडले होते. १६ मृतांमध्ये कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा देखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्ब्ल तीन दिवसांनी मृतदेह सापडला.

कार्तिक आर्यनचे मामा मनोज चांसोरिया नाव होतं तर मामीचं नाव अनिता चांसोरिया होतं. ते मुंबईतील विमानतळाचे माजी संचालक होते. मनोज चांसोरिया यांनी मुंबईच्या एटीसीमध्ये काम केले होते. वर्षभरापूर्वीच ते निवृत्त झाले होते. ते पत्नीसह जबलपूरला राहायचे. व्हिसा संबंधित काम असल्यामुळे दोघेही कारने मुंबईला आले होते. त्यांचा मुलगा यश अमेरिकेला राहतो. त्यामुळे अमेरिकेला जाण्यासाठी ते व्हिसाच्या कामासाठी मुंबईत आले होते. मुंबईहून जबलपूरला परताना पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले आणि काळाने त्यांचा घात केला.

बचावकार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग

सोमवारी (१३ मे) रोजी दुपारी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले. तेव्हापासून चांसोरिया कुटुंबाचा फोन बंद झाला होता. त्यांचा मुलगा यश अमेरिकेतून फोन करत होता, मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने मुंबईतील मित्राला याबाबत माहिती दिल्यावर चांसोरिया यांचा शोध घेण्याची विनंती केली. पोलिसांनी चांसोरिया यांचा फोन ट्रॅक केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखविण्यात आले. त्यांची गाडी आत अडकली होती, त्यामुळे मृतदेह तीन दिवस सापडला नाही.मृतदेह सर्वात शेवटी सापडल्याची बातमी आहे.


माहिती मिळताच त्यांचा मुलगा यश याने अमेरिकेहून मुंबई गाठली. पोलिसांनी तपास करताना घटनास्थळी ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले होते, मात्र तीन दिवस उलटून गेल्याने मृतदेहाची ओळख पटू शकत नव्हती. यशने अंगठीवरून आई-वडिलांना ओळखलं. गुरुवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मामा -मामीच्या अंत्यसंस्काराला कार्तिक आर्यनदेखील गेला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img