3.6 C
New York

Ghatkopar Hoarding : भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

Published:

मुंबई

मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग (Ghatkopar Hoarding) उचलल्याने मोठी दुर्घटना झाली होती. या प्रकरणात होर्डिंग मालक भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) काल गुरुवारी राजस्थान मधील उदयपूर मधून अटक केली होती. त्यानंतर आज न्यायालयात (Court) हजर केले असता आरोपी भावेशला 9 दिवसाची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे.

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 पेक्षा अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात होर्डिंग मालक भावेश भिंडे ला मुंबई पोलिसांनी गुरुवार दिनांक 16 मे रोजी उदयपूर मधून अटक केली होती. आज पोलिसांनी भावेशला विक्रोळी कोर्टात हजर केले असतात न्यायालयाने 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

बॅनर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे. त्यानंतर, भावेशला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी, भावेशचे वकिल रिझवान मर्चंट यांनी वादळी युक्तिवाद करत पोलिसांनी चुकीचे कलम लावल्याचे म्हटले. तसेच, आरोपीविरुद्ध चुकीचे कलम लावण्यात आले असून चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचंही त्यांनी न्यायलयात म्हटले. दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेवरुन आता राजकारणही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं, त्यावेळी होर्डिंगचं स्ट्रक्चर हे उत्तम दर्जाचं असल्याचा अहवाल 2023 मधील आहे.  अहवालात होर्डिंगची उंची लांबी रुंदी आणि इतर गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत,असा युक्तिवाद आरोपीचे वकिल रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात केला आहे. तसेच, या गुन्ह्यात 304 हे कलम लागू शकत नाही. तर, आरोपीला अटक करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा युक्तिवादही रिजवान मर्चंट यांनी के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img