आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल Swati Maliwal यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहाय्यक विभव कुमार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विभव कुमारवर स्वाती मालिवाल यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय. विभव कुमारने माझ्या कानशिलात लगावली, त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. 13 मे रोजी नेमकं काय झालं, त्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहेत.
मोदीच विकसित गती देणार- पियुष गोयल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल जेव्हा मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा, काठीने मारहाण केल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वाती मलिवाल यांनी सोमवारी कुमारने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. या आरोपांची आम आदमी पक्षाने पुष्टी केली आहे. मात्र, याप्रकरणी कोणतीही रीतसर तक्रार दाखल झाली नव्हती. दिल्ली पोलिसांनी अखेर तक्रार दाखल झाल्यानंतर बिभव कुमार यांच्या विरुद्ध गुन्हेगारी धमकी, महिलेचा विनयभंग, महिलेचा अपमान करण्याच्या दृष्टिने केलेली कृती आणि स्वेच्छेने दुखापत केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.
Swati Maliwal त्या दिवशी नेमकं काय झालं?
स्वाती मालीवाल जेव्हा मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. यानंतर स्वाती मालीवाल यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती. या घटनेनंतर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली होती. ही घटना निंदनीय असून मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करतील असंही आपकडून स्पष्ट करण्यात आलं.