26 C
New York

Fake Notes : युट्यूबवर बघून छापल्या बनावट नोटा

Published:

Fake Notes : नवी मुंबईतील तरुणाला अटक

नवी मुंबई : बनावट नोटांची (Fake Notes) छपाई करून बाजारात आणणारी अनेक रॅकेट यापूर्वी पोलिसांनी उघडकीस आणली आहेत, पण आता नवी मुंबई पोलिसांनी वेगळेच रॅकेट उघडकीस आणले आहे. युट्यूबवर बघून बनावट नोटा बनवणाऱ्या तरुणाला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

तळोजा भागातील तोंडरे गावात प्रफुल्ल गोविंद पाटील हा 36 वर्षीय तरुण युट्यूबवर बघून 10, 50, 100 आणि 200 च्या बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पाटील याच्या घरावर छापा टाकून 2 लाख 3 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छपाई करण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले आहे.

प्रफुल्ल पाटील हा नववीपर्यन्त शिकलेला असून तो एकटाच रहातो. पैशांची गजर भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा छपाईची माहिती यूट्यूबवर मिळवली. आणि कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने कमी मुलींच्या नोटा तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे उघड झाले आहे. प्रफुल्ल पाटील गेल्या काही महिन्यांपासून बनावट नोटा छापत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. या काळात त्याने किती रुपये मूल्याच्या बनावट नोटा बाजारात आणल्या आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img