मुंबई
शिवाजी पार्क (Shivaji Park) ही ऐतिहासिक जागा आहे. या जागेवरून बोलताना, हिंदुह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) अभिमानाने माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी साद घालायचे. काल, पर्वापर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ही गर्जना देत होते, पण इंडिया आघाडीने (India Alliance) सांगितलं आणि आता त्यांनी ही गर्जनाच बंद केली, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
मुंबईतील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी केली. लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.
नालायकांनो मतांसाठी देशाचे आणि शहिदांचा अपमान करू नका. आम्ही उज्जल निकमांसोबत आहोत. आता मतं भेटत नाहीत, त्यामुळं त्यांनी लांगून चालन सुरू केलं आहे. आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं आणि कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. पाकिस्तानचे झेंडे फडकवून मतं मागायची वेळ आली असेल तर राजकारणातून बाहेर पडावे, हे सांगतात वोट जिहाद करा, अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.