21 C
New York

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) राज्यातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईत (Mumbai) आज सभेचा धडाक लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 विधानसभेनंतर भाजप (BJP) कडून कशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसण्यात आले होता. यावर वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरोधात विधान केले होते. परंतु नंतर दोन्ही पक्षांमध्ये सर्व वाद संपुष्टात आले आणि दोन्ही पक्ष एकत्रित आले होते. त्यामुळे अमित शहा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेने अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मागितले होते. परंतु अमित शहाणी त्याला नका दिला होता. त्यामुळे आमच्यातील बोलणे थांबले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थीला पाठवून चर्चेची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्रीपदा आयोजित जास्तीचे मंत्रीपद आणि अधिक निधी असलेल्या खाते मागितले होते. त्यावर चर्चा झाली सगळे ठरले आणि त्यांनी अमित शहाना मातोश्रीवर यावे अशी अट घातली अमित शाहांनी नवीन कोणतेही इश्यू काढू नका असं म्हणत येण्याची तयारी दर्शवली होती असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. दोघांची सहमती झाली आणि मग मला बोलावलं. त्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं, याची उजळणी माझ्याकडून करवून घेतली. पत्रकार परिषदेमध्ये मी एकट्यानेच भूमिका मांडली आणि प्रश्नोत्तरे झाली नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img