मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्या अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांना शिवसेना शिंदे गटाच्या (ShivSena Shinde Group) महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण मुंबई मतदार संघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पौळ पाटील यांना फोन करून विचारपूस केली आहे. यासंदर्भात पोलिसांत रितसर तक्रार करण्यासही ठाकरे यांनी फोनवरून सांगितलं.
अयोध्या पौळ यांनी व्हिडिओत म्हणाले की, काही महिला घरात घुसल्या. त्यांनी मला मारहाण केली असा आरोप अयोध्या पौळ पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह केला. संबंधित महिला कार्यकर्त्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवरही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. लोकांना पराभव समोर दिसत असल्यानं हा हल्ला केला, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.