19.7 C
New York

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याचा रोख कुणाकडे?

Published:

महायुतीच्या उमेदवार भारती पवार (Bharati Pawar) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज मनमाडमध्ये सभा झाली. या सभेत बोलतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका विधानावर जोरदार चर्चा रंगली आहे. मी बीड जिल्ह्याची निवडणूक कशी लढले? हे सर्वांना माहित आहे, असं सूचक विधान पंकजा यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा रोख कोणाकडे आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे.

Pankaja Munde बीड जिल्ह्याची निवडमूक मी लढते

या सभेला संबोधित करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य स्थापनेसाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान दिले. मात्र, आताचे महाराष्ट्रातील काही नेते हे विसरायला लागले आहेत. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. मोदींना थांबवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते जाती-धर्माच्या भिंती निर्माण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, पण हे होऊ दिलं नाही पाहिजे, अशी माझी विनंती आहे. बीड जिल्ह्याची निवडमूक मी लढते. ही निवडणूक मी कशी लढले? तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे, असं त्या म्हणाल्या.

पृथ्वीराज चव्हाणांचे मविआच्या नेत्यांना खडेबोल, म्हणाले

त्या म्हणाल्या, विरोधक दिशाभूल करत आहेत. मोदी से डरो असं ते मुस्लिमांना सांगत आहेत. कशामुळे डरो? दहा वर्षांत एकाही मुस्लिमाच्या केसाला धक्का लागला नाही. उलट मुस्लिमांच्या बळकटीकणासाठी काम करण्यात आले. मात्र, मतांचे राजकारण करण्यासाठी मुस्लिमांना भारतीय जनता पक्षापासून दूर करण्यासाठी त्यांना भीती घातली जात आहे. मात्र, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.’

पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदीजी राज्यघटना बदलतील, असं विरोधक सांगत आहे. मात्र, संविधानातील एक शब्दही बदलण्याची मानसिकता मोदींची नाही. उलट ते संविधान अधिक दृढ करत आहे. त्यामुळे ज्यांनी महामानवाला निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी महामानवाच्या संविधानाची चिंता करण्याची गरज नाही. घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

Pankaja Munde मोदींच्या योजनांचं पारडं जड…

तराजूच्या एका बाजूला मोदींजींच्या योजना ठेवा, अन् एका बाजूला नाराजीचे मुद्दे ठेवा. मोदींजींच्या योजनाचं पारडं नक्कीच जड होईल. राज्यात कांदा, सोयाबीनचे मुद्दे गंभीर आहेत. त्यावरही मोदीजी कायमस्वरुपी तोडगा काढतील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img