21 C
New York

Pankaja Munde : …त्यांनी संविधानाची काळजी करू नये, मुंडेंचा विरोधकांना टोला

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आताही भाजप नेत्या पंकजा मुडेंनी (Pankaja Munde) विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महामानवांना ज्यांनी एक निवडणूकही जिंकू दिली नाही, त्यांनी महामानवांच्या घटनेची काळीज करण्याची गरज नाही, असा टोला मुंडेंनी लगावला.

Pankaja Munde सत्तेत आले तर मुस्लिमांना घातक

दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आज मनमाड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करतांना पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भिंत उभी करत आहेत. मोदी सत्तेत आले तर ते संविधान बदलतील, मोदीजी सत्तेत आले तर मुस्लिमांना घातक ठरतील, अशी टीका विरोधक करत आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षात मुस्लिमांवर भाजप सरकारने कोणताही अन्याय केला नाही. सर्व सवलती, योजनांचा लाभ मुस्लिमांना मिळालेला आहे. मात्र, विरोधक मुस्लिमांची मते वळण्यासाठी मुस्लिमांच्या मनात भीती घालताताहेत, अशी टीका मुंडेंनी केली. या देशात मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा शब्दही पंकजा मुंडेंनी दिला.

पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याचा रोख कुणाकडे?

Pankaja Munde महामानवच्या घटनेची काळीज करण्याचं कारण नाही

मुंडे म्हणाल्या, एकाच्या तोंडचं काढून दुसऱ्याच्या तोडात घालयाचं हा अन्याय कोणीही सहन करू शकणार नाही. मोदींनी दहा वर्षात संविधानातला एक शब्दही बदलला नाही. उलट आम्ही संविधान मजबूत करतो. एससी, एसटीचं आऱक्षण मजबूत करण्याचं मोदींचं धोरण आहे. महामानवांना ज्यांनी एक निवडणूकही जिंकू दिली नाही, त्यांनी महामानवच्या घटनेची काळीज करण्याचं कारण नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला.

मोदींनी दिलेल्या अनेक योजनांचा आपण लाभ घेतलाय. आयुष्यमान योजनेचा लाभ अनेकांनी घेतला. शेतकरी सन्मान निधीचाही प्रत्येक शेतकऱ्याने फायदा उचलाला आहे, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, हे फक्त मोदींच्याच काळात होऊ शकतं. मोदींजी पंतप्रधान पदाची पुन्हा हॅट्रीक करतील, असा विश्वास व्यक्त करत पंकजा मुंडेंनी भारती पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून दिल्लीला पाठवा, असं आवाहन केलं. तराजूच्या एका बाजूला मोदींजींच्या योजना ठेवा, अन् एका बाजूला नाराजीचे मुद्दे ठेवा. मोदींजींच्या योजनाचं पारडं नक्कीच जड होईल. राज्यात कांदा, सोयाबीनचे मुद्दे गंभीर आहेत. त्यावरही मोदीजी कायमस्वरुपी तोडगा काढतील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img