3.6 C
New York

Loksabha : सांगलीनंतर सोलापूरच्या उमदेवारांवर लागली पैज

Published:

सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाच वाटप यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पूर्ण झाला आहे. या लोकसभा (Loksabha) निवडणुकीत सर्वात चर्चेतील असलेला सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) अशी लढत होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. मात्र आता या मतदारसंघातून कोण निवडून येणार यावर मनसे (MNS) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांकडून पैज (Bet) लावण्यात आली आहे. आता या पैज मध्ये कोण जिंकणार हे 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकांचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. मात्र त्याआधीच निकालाचे अंदार्ज वर्तवले जात आहेत, अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्सही झळकू लागलेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यापैकी चार टप्पे पूर्ण झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणत अनेक कार्यकर्त्यांनी लाखोंच्या पैजेचा विडाही उचलला आहे. अशीच एक पैज सोलापूर लोकसभेसाठीही लागलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये तब्बल एका लाखाची पैज लागली आहे.

सोलापुरमध्ये भाजपचे राम सातपुते जिंकणार असा दावा करत मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी १ लाख १ हजार रुपयांची पैज लावली आहे. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी १ लाख १ हजाराच्या पैजेचा विडा उचलला आहे. त्यामुळे ही एका लाखाची पैज कोण मारणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे यात नमूद केलं आहे. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र, या पैजेची उत्सुकताही आता सांगलीकरांना लागली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img