3.6 C
New York

RTE admission : आरटीई प्रवेशाचा अर्ज उद्यापासून भरता येणार

Published:

आरटीई प्रवेश RTE admission प्रक्रियेंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया उद्या शुक्रवार (दि. 17 मे)पासून विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पालकांनी भरले होते. त्या विद्यार्थ्यांचे अर्ज पालकांना पुन्हा भरावे लागणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आरटीई पोर्टलवर जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमता प्रसिद्ध केली आहे. 2024- 25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार 138 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एक लाख 2 हजार 434 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात पुढील 2 दिवस उकाडा वाढणार

RTE admission इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार

सध्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक बंद आहे. परंतु, पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून संधी दिली जाणार आहे. पूर्वी राज्यातील 76 हजार 53 शाळांमधील आरटीईच्या 8 लाख 86 हजार 411 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ 69 हजार 361 पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RTE admission खासगी शाळांमधील 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव

महाराष्ट्र सरकारनं राज्यात शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमधील नियमांमध्ये बदल केला होता. सरकारच्या नव्या नियमानुसार एखाद्या सरकारी अनुदानित प्राप्त शाळेच्य एक किलोमीटर परिघात खासगी शळा असल्यास त्या खासगी शाळेला आरटीई अंतर्गत जागा राखीव ठेवण्याचं बंधन राहणार नव्हतं. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आरटीईमध्ये 75000 हजार सरकारी शाळांची वाढ होऊन उपलब्ध जागांची संख्या साडे नऊ लाख प्रवेशांपर्यंत गेली असती. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली. यामुळं महाराष्ट्र सरकारला खासगी शाळांमधील 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाकडे परत जावं लागलं. खासगी शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आरटीईच्या 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. राज्य सरकार त्यांची फी शाळांना देत असते.

RTE admission आरटीई प्रवेशाच्या किती जागा?

राज्यात सध्या 9138 शाळांमध्ये आरटीईनुसार 1 लाख 2 हजार 434 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 573 शाळा आरटीईच्या नियमात येतात तिथं 4441 जागा उपलब्ध आहेत. राज्य सरकारनं नियमात बदल केल्यानं आरटीई प्रवेश प्रक्रियेला उशीर झालेला आहे. राज्य सरकारनं बदलेल्या नियमानुसार 70 हजर जणांनी नोंदणी केली होती. मात्र, सर्वांना नव्यानं नोंदणी करावी लागणार आहे. शालेय शिक्षण (प्राथमिक) चे संचालक शरद गोसावी यांनी नवी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु होणार आहे, अशी माहिती दिली. आता नव्यानं नोंदणी करावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img