अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. कधी वादामुळे तर कधी वेगळ्या कारणामुळे ती चर्चेत आली आहे. राखीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच तिचा हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपलेला फोटो व्हायरल झाला आहे.
बॉलीवूडच्या आयटम गर्लला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित आजार असल्यामुळे तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राखी रुग्णालयातील एका खाटेवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे आणि डॉक्टर तिची तपासणी करताना दिसतात. या बातमीमुळे राखीच्या चाहत्यांना धक्का बसला. ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे. अशातच राखीचा एक्स-हसबैंड रितेश सिंगने (Ritesh Singh) तिच्या समस्येवर भाष्य केले. एका मुलाखतीत रितेश म्हणाला,”राखीची अवस्था फार बिकट आहे. ती खूप गंभीर आजारी सामना करत आहे. खरतर राखीच्या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाही परंतु यावेळी हीबाब प्रचंड गंभीर आहे.”
बेशुद्ध अवस्थेत राखी सावंत रुग्णालयात… नेमकं काय झालं राखीला ?
राखीला किडनी आणि हृदया संबंधित आजार असल्याचे रितेशने सांगितले. पुढे तो म्हणाला,”डॉक्टरच्या म्हणण्यानुसार राखीच्या पोटाला सूज आली आहे. तिला किडनीची समस्या देखील आहे आणि हृदया संबंधित आजार आहे. अद्याप टेस्टचे रिपोर्ट आलेले नाहीत मात्र सोनोग्राफीचे रिपोर्ट आलेले आहेत ज्यात ट्युमर वाढलेला दिसतोय. हा ट्युमर कॅन्सर निगडीत आहे की नाही याचा तपास डॉक्टर करत आहेत. परंतु परिस्थिती अतिशय गंभीर आहे.” राखीविषयी बोलताना रितेश म्हणाला,”राखी नेहमी हसत असते त्यामुळे तिच्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. पण गेल्या वर्षभरात तिने खूप मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत आहे.”
‘Viral bhayani’ या इंस्टाग्राम अकाउंटने राखीचा फोटो पोस्ट केला होता. अद्याप तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. राखीला सध्या तिच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे. तिने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ती सध्या बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांकडून काय माहिती मिळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.