3.6 C
New York

Raj Thackeray : शिवतीर्थावरील मोदींच्या सभेत राज ठाकरे गर्जणार

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) 20 मे रोजी होणार आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासह 13 मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यातील प्रचाराचा तोफा 18 मे रोजी थंड होणार आहे. उद्या 17 मे रोजी महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचाराकरिता शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला मनसे (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) देखील संबोधित करणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावरील भव्य मंचावरून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहे. यावेळी महायुतीतील दिग्गज नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उपस्थित असतील. मुंबईसह राज्यातून ही मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असेल. मुंबईतील मराठी माणसांच्या मतावर महायुतीचा डोळा आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या सभेची राजकीय वर्तुळातच नाही तर सर्वसामान्यांमध्ये पण उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img