4 C
New York

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचे मविआच्या नेत्यांना खडेबोल, म्हणाले

Published:

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निडणुका होणार आहेत. त्यासाठीही आतापासूनच रणनीती ठरू लागली आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सामना दिलेल्या मुलाखतीत आता उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदासंदर्भात सूचक विधान केलं होतं. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला तगडे आव्हान दिलं. मविआने विधानसभा निवडणुकीतही महायुतीला आव्हान देण्याची तयारी केली आहे.

Prithviraj Chavan महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच सांगितला

मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत मविआत अनेक प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. याविषयी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच सांगितला. ते म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजेच ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असतात, त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं चव्हाण म्हणाले.

विरोधकांच्या आरोपांवर उमेश पाटलांचे प्रतिउत्तर

Prithviraj Chavan मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणार नाहीत

पुढं बोलतांना ते म्हणाले, आत्तापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे, जेव्हा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर लढत होते, तेव्हा ज्या पक्षाचे आमदार जास्त होते त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येईल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फॉर्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले

यावेळी बोलताना चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीबाबतही भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळतो. आताच्या घडीला माझं महाराष्ट्राचं जे आकलन आहे, त्यानुसार, महाविकास आघाडीला लोकसभेला ३२ ते ३५ जागा मिळतील, ही संख्या वाढू शकते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीची फायदा मविलाआला होऊ शकतो. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे. यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, संविधान बचाव या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सर्व मुद्दे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिल्याचं चव्हाण म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img