मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना ठाकरे गटाने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आंबेडकरांनी सांगितलं की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सोबतच्या चर्चेदरम्यान संजय राऊत यांनी भाजपसोबत (BJP) न जाण्याची अट अमान्य केली होती.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत युतीच्या चर्चा करत होतो. याच दरम्यान आम्ही काही अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत पुढील पाच वर्ष न जाण्याची अट ठाकरे गट आणि स्वतः संजय राऊत यांनी मान्य केली नव्हती. यावेळी स्वतः संजय राऊत यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आम्हाला सांगितलं की, पुढील पाच वर्ष भाजपसोबत न जाण्याची अट आणि लेखी देऊ शकत नाही. कारण आम्ही अद्यापही भाजपची दारं बंद केलेले नाहीत. असाच स्वर ठाकरे गटासह राष्ट्रवादीचा होता. असं यावेळी आंबेडकर म्हणाले.
या अगोदर देखील प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत खळबळजनक दावा केला होता. चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली होती. असं ते म्हणाले होते. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कशासाठी फोन केला असावा असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.