पेण
आज संध्याकाळी 5 वाजन्याच्या सुमारास पेणसह (Pen) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Pen Heavy Rain) वादळी वार्यासाह हजेरी लावून सर्वांचीच दाणादान उडवली.
दोन दिवसांपूर्वी नागोठने आणि मानगावमध्ये गारांचा पाऊस झाला असतानाच आज संध्याकाळी जिल्हयाच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्याबरोबरच आंबा, काजू बागायतदार आणि वीटभट्टी मालकांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
आज पेण, खालापूर, सुधागड आणि कर्जत या भागात अवकाळी पावसाने जोरदार वार्यासह संध्याकाळी हजेरी लावली. आज संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पेणकरांची विशेष ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. आजच्या पावसाने आंबापीका बरोबरच कडधान्य पीकाला मोठा फटका बसणार आहे. उरलेसुरले पीक घरात घेवून येण्यासाठी शेतकरयांची लगबग सुरू असतानाच आज पावसाने दाणादान उडवली. तसेच पेण मधील गणपती कारखानदारांची ही मोठ्या प्रमाणात दानादान उडाली.
यंदा जिल्ह्यात आंब्याचे पिक चांगल्या प्रमाणात आले आहे आणि आत्ता पाड़ पड़न्यास (आंबा पिकन्यास सुरवात) सुरवात झाली आहे. मात्र या अवकाळी पावसाने आंब्याची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. तर दुसरीकडे वीट भटटी मालकांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.