23.1 C
New York

Mumbai: मुंबईतील महाविद्यालयाने कॅम्पसमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यास मनाई

Published:

(Mumbai) चेंबूरमधील आचार्य मराठे (Acharya Marathe College) कनिष्ठ महाविद्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मुस्लिम मुलींना कॅम्पसमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यास मनाई केली आहे. जून महिन्यात कॉलेज सुरु होतात. अशातच आचार्य मराठे कनिष्ठ महाविद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. फक्त कनिष्ठ महाविद्यालयाने नव्हे तर पदवी महाविद्यालयातही हा नियम लागू करण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरवातीला कॉलेजने एक ‘ड्रेस कोड’ सादर केला होता. ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच, धार्मिक महत्त्व असलेले कपडे घालण्यावर बंदी आणण्यात आली होती. विशेषत: मुस्लिम मुलींना परिधान केलेले हिजाब, निकाब आणि बुरखा.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आचार्य मराठे महाविद्यालयाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिजाब आणि बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. तर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आता पर्यंतच पहिल्यांदाच मुलांसाठी शर्ट आणि ट्राउझर्स आणि मुलींसाठी सलवार, कमीज आणि जॅकेट हे कपडे परिधान करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर, महाविद्यालयाने त्यांना आवारात प्रवेश करण्यास परवानगी दिली परंतु वर्गात जाण्यापूर्वी त्यांचे आवरण काढण्यास सांगितले. या कारवाईमुळे अनेक मुस्लिम मुलींनी कॉलेज सोडले होते.

इलेक्ट्रोल बॉंड घोटाळा जगात सर्वात मोठा- ठाकरे

कॉलेजनी घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने महिला मुस्लिम विद्यार्थिनींची संख्या घटली आहे. निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देताना कॉलेजने धार्मिक महत्त्व असलेले कपडे कॉलजमध्ये परिधान करण्यास बंदी घातली आहे. विशेषत: मुस्लिम मुलींना परिधान केलेले हिजाब, निकाब आणि बुरखा. कारण त्यामुळे चेहरा झाकला जातो.

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नव्या नियमाविषयी मेसेज केला. ज्यामध्ये जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना, विद्यार्थ्यांनी फक्त ‘औपचारिक’ आणि ‘सभ्य’ कपडे परिधान करावेत. पुरूष विद्यार्थ्यांनी पूर्ण किंवा हाफ शर्ट घालणे आवश्यक आहे. महिला विद्यार्थिनींना भारतीय किंवा पाश्चात्य’ फुल फॉर्मल ड्रेस’ घालण्यास सांगितले आहे.

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश करताच ‘बुरका, निकाब, हिजाब किंवा बिल्ला, टोपी, यांसारख्या धर्माची माहिती देणारा ड्रेसचा कोणताही भाग सामान्य खोलीत काढून टाकावा’, असेही निर्देशात म्हटले आहे. आठवड्यातून एकदा गुरुवारी ड्रेस कोडपासून शिथिलता दिली आहे. अनेक मुस्लीम विद्यार्थिनींनी त्यांच्या पारंपरिक पोशाखावरील निर्बंधांवर आक्षेप घेतला आहे. सोमवारी, 30 विद्यार्थ्यांनी कॉलेजला पत्र सादर केले आणि कोणताही ड्रेस कोड लागू करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली.

“कलम 21 आणि 25 घटनेवर आधारित धर्म आणि संस्कृती निवडण्याचा आणि त्याचा दावा करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांवर नैतिकता लादण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे चालू शैक्षणिक वर्षात अनावश्यक ताण आणि अभ्यासाचे नुकसान (sic) होईल,” असे मुद्दे पात्रात नमूद केले आहेत. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली आणि परंतु प्राचार्यांनी त्यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. महिला विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी देखील केल्या आहेत, जिथे त्यांनी असा युक्तिवाद केला की महाविद्यालयाचा निर्णय भेदभाव करणारा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img