2.5 C
New York

Monsoon IMD: मान्सूनबद्दल मोठी अपडेट समोर, या तारखेला पडणार पाऊस

Published:

घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावर्षी, नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून अंदमानमध्ये वेगाने पुढे सरकत आहे. मान्सून १९ मेपर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने (Monsoon IMD) दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.आता हवामान खात्याने मान्सूनच्या पुढील वाटचालीचा अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी व नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मान्सून केरळमध्ये ४ जूनला दाखल होईल असा अंदाज होता. पण त्याचा प्रवास लांबला होता. गेल्या वर्षी ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यापूर्वी 2022 मध्ये मान्सूनने 29 मे 2021 रोजी 3 जून, 1 जून 2020 आणि 8 जून 2019 रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता.

गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या भारताला यंदा फायदा

गेल्या वर्षी एल निनोचा परिणाम मान्सूनवर झाला होता. तो यंदा कमकुवत झाला आहे. ला निनो आता हिंदी महासागरात सक्रिय झाले आहे. त्यामुळे यंदा चांगला मान्सून होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची हालचाल दिसून येते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या भारताला यंदा फायदा होणार आहे.

भारतीय हद्दीत मान्सूनला अनुकूल बदल होत आहे. आता हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कमी दाबाचा पट्टा मान्सूनला अनुकूल ठरतो. यावर्षी 19 मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होईल, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. त्यानंतर मान्सून पुढील 10 दिवसांत केरळमध्ये दाखल होईल. म्हणजेच यंदा 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. मान्सून केरळमध्ये आल्यावर तो महाराष्ट्राकडे सरकू लागतो, ४ दिवसांत मान्सून केरळमधून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गेल्या महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार यंदा 106 टक्के पाऊस पडणार आहे. हे सरासरीपेक्षा जास्त आहे. आता दुसरा अंदाज मे महिन्याच्या शेवटी येईल.

भेंडवळ घट मांडणीचं भाकीत जाहीर; शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img