21 C
New York

Maratha Reservation : दुष्काळामुळे मराठा समाजाची सभा रद्द

Published:

बीड

मराठा आरक्षणाकरिता (Maratha Reservation) पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मैदानात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतमोजणीच्या दिवशी 4 जून पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले होते. तसेच 8 जून रोजी भव्य मराठा समाजाची सभा आयोजित करण्यात आले होते. मात्र ही सभा दुष्काळामुळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती बीडमधील मराठा समन्वयक तथा आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मनोज जरांगे यांची 8 जून रोजीची सभा रद्द झाली आहे. भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द केली आहे. पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार आहे. तब्बल 900 एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती. या सभेला तब्बल 6 कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या सभेसाठी राज्यातूनच नाही तर परप्रांतातून देखील लोक येणार होते. आता पुढची सभा कधी होणार, याबाबत बैठक होणार आहे. जूननंतर सभा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img