19.7 C
New York

Mamata Banerjee : इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींची पुन्हा एंन्ट्री?

Published:

लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha Election) आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडले आहे त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांच्या प्रचार कार्याला जोर आला आहे या दरम्यानच जागावाटपाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतून ( India Alliance ) बाहेर पडलेल्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी मोठी घोषणा केली आहे बॅनर्जी म्हणाला की इंडिया आघाडीचे सरकार आलं तर बाहेरून समर्थन देणार.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी इंडिया आघाडी सोबत कोणत्या प्रकारची वृत्तीने असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की, ही आघाडी स्थापन करण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र या आघाडीतील पश्चिम बंगालमधील सीपीआय (एम) हा पक्ष तसेच काँग्रेस हा पक्ष भाजपासाठी काम करत आहे.

दुष्काळामुळे मराठा समाजाची सभा रद्द

मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपवर टीका करत ममता यांनी आपला तृणमूल काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण मदत करेल. राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीला आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. अशी घोषणा केली आहे. तसेच यावेळी ममता यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनआरसी आणि समान नागरी संहिता म्हणजेच युसीसी या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही. अशीही ग्वाही दिली. त्यामुळे आता ममतांच्या या विधानाने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधान आले आहे.

Mamata Banerjee …म्हणून बाहेर पडल्या होत्या ममता

ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img