23.1 C
New York

leopard: काळवाडीत बुधवारी बिबट्याची मादी जेरबंद

Published:

ओतूर,प्रतिनिधी ( रमेश तांबे )

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चाळकवाडी, वामनपट्टा शिवारात बुधवारी दि.१५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या (Leopard) जेरबंद केल्यानंतर,त्याच रात्री नऊ वाजता काळवाडीत बिबट्याची मादी जेरबंद झाली. गेल्या आठवड्याभरात काळवाडी,पिंपरीपेंढार येथील गाजरपट, पिंपळवंडी, चाळकवाडी, वामनपट्टा परिसरात आणि इतर ठिकाणी, जुन्नर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आत्तापर्यंत एकूण सात बिबटे जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

आत्याच्या गावी आलेल्या बालकावर बिबट्याचा हल्ला

दरम्यान काळवाडी येथे जेरबंद केलेल्या बिबट्याच्या मादीचे वय ५ ते ६ वर्षाचे असून,सदर बिबट्याच्या मादीला रेस्क्यू टीम चे सदस्य व वन कर्मचाऱ्यांनी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हालवले आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे दि.११ एप्रिल रोजी संस्कृती संजय कोळेकर या दीड वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे दि.५ मे रोजी अश्विनी मनोज हुलवळे वय २४ वर्ष, ही महिला शेतात खुरपणीचे काम करत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काळवाडी येथे दि.८ मे रोजी यात्रेनिमित्त आत्याच्या गावी आलेल्या रूद्र महेंद्र फापाळे या आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने,त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर पिंपरी पेंढार गाजरपट येथे दि. १० मे रोजी नानूबाई सिताराम कडाळे वय ४५ वर्ष, ही महिला शेतात बाजरी राखण्याचे काम करत असताना,बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारले.

मान्सूनबद्दल मोठी अपडेट समोर, या तारखेला पडणार पाऊस

या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यातील चार घटनांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला. पिंपरी पेंढार गाजरपट येथे दि.१० व दि.११ रोजी दोन बिबटे आणि एक बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. दि.१० रोजी पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. त्यानंतर दि.१३ रोजी काळवाडीत बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली.त्यानंतर बुधवारी दि.१५ रोजी चाळकवाडी वामनपट्टा शिवारात दत्ताजी बाळाजी वामन,यांचे शेतात सहाव्या बिबट्या जेरबंद करण्यात आला.त्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजता काळवाडीत बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. 

दरम्यान शिरोली खुर्द,काळवाडी,पिंपरीपेंढार येथील गाजरपट,पिंपळवंडीत,चाळकवाडी,वामनपट्टा परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे एकुण ३७ पिंजरे आहेत, तसेच २५ ट्रॅप कॅमेरे आणि गाजरपट,काळवाडी,धोलवड येथे थर्मल ड्रोन च्या साह्याने रात्रंदिवस सर्वेचे काम अध्यापही सुरू असून, या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह वन कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालत असल्याचे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img