कल्याण
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यात राज्यात 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या रणधुमाळी सुरू आहे. कल्याण (Kalyan) लोकसभा (kalyan Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचारार्थ आले होते प्रचार सभेच्या स्थळी जात असताना रस्त्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या समर्थांना घोषणा देत होते. उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी डिवचले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत असून प्रचाराने वेग धरलाय. आज उद्धव ठाकरे गटाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये सभा घेत आहेत. एकीकडे निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला असता दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचलाय. प्रचारानिमित्त दोन्ही गटातील नेते एकमेकांसमोर आले तर कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत डिवचत असतात.
आज उद्धव ठाकरे हे डोंबिवलीमध्ये उबाठा गटाचे उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेत. त्यादरम्यान त्यांच्या वाहनाचा ताफा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपूत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानासमोरून गेला,त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीकातं शिंदे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत ठाकरेंना डिवचलं. आज दुपारी मुख्यमंत्री रोड शो करत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत त्यांना डिवचलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाणाचे अॅक्शन करत त्यांना उत्तरल दिलं. आता त्या घोषणांचा बदल शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत घेतला.