10.4 C
New York

Jayant Patil : महिन्याभरात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या- पाटील

Published:

मुंबई

मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोला त्यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img