23.1 C
New York

CM Eknath Shinde : राऊतांच्या आरोपानंतर झाली मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी

Published:

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसेवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी पुन्हा नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे आज हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते की, मुख्यमंत्री प्रचार सभेला जाताना त्यांच्यासोबत पैशांची बॅग घेऊन जात आहेत. राऊतांच्या याच टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकात दाखल होताच उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आताही बॅगा घेऊन आलोय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी करण्यात आली. परंतू या बॅगांमध्ये त्यांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही.

‘त्या’ दुर्घटनेनंतर मोदींचे कटआऊट हटवले

या बॅगांमध्ये कॅमेराचे साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या. संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आलेले नाहीत. या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रितसर शुटिंगही केले आहे. एकनाथ शिंदे यांनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नऊ बॅगांमध्ये 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये घेऊन आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

CM Eknath Shinde राऊतांचा आरोप काय?

मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण असे ट्वीट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले होते. शिवाय नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पैशाचा पाऊस. दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? असा प्रश्न राऊत यांनी केला होता. यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. असं ट्वीट करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img