23.1 C
New York

Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधाराने केली निवृत्ती जाहीर

Published:

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले. सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 39 वर्षीय छेत्रीने त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले आहेत. यावेळी छेत्रीने 93 गोल केले आहेत.भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले.

Sunil Chhetri छेत्री त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये भावूक झालेला

सुनील छेत्रीने गुरुवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. छेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट केलीये. यावेळी त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून निवृत्त होणार असल्याचं सांगितलंय. संदेशाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. सुनीलने सुमारे 9 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये निवृत्तीच्या निर्णयाबद्दल सांगितलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुनीलने लिहिले की, मला तुम्हाला काही सांगायचंय. छेत्री त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये भावूक झालेला दिसतोय. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या डेब्यू सामन्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहेय. छेत्रीचा शेवटचा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. ज्या शहरात त्याने इतका फुटबॉल खेळला त्याला निरोप देण्यापेक्षा या सुवर्ण प्रवासाचा दुसरा चांगला निष्कर्ष असू शकत नाही.

इलेक्ट्रोल बॉंड घोटाळा जगात सर्वात मोठा

भारत सध्या अ गटात चार गुणांसह कतारनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीने मार्चमध्ये 150 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि गुवाहाटीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही एक गोल केला. भारताने तो सामना तरी १. 2 ने पराभूत झाले. देशाच्या सर्वोत्तम स्ट्रायकरपैकी एक बनलेल्या छेत्रीने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल पदार्पणाच्या सामन्यात गोल केला होता.छेत्रीने सांगितले की, मी माझा पहिला सामना खेळलो तो मला अजूनही आठवतोय. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. मुळात मला कधीच वाटलं नव्हतं की, मी भारतासाठी इतके सामने खेळू शकेन. मी या निर्णयाबाबत पहिल्यांदा माझ्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. यावेळी माझी बायको मात्र रडू लागली. वडिलांना या निर्णयाचा आनंद झाला.

Sunil Chhetri ‘गेल्या 19 वर्षांच्या माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी…’

या व्हिडीओमध्ये सुनील छेत्री म्हणतोय की, गेल्या 19 वर्षांतील माझ्या लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे कर्तव्य, दबाव आणि अपार आनंद. वैयक्तिकरित्या, मी कधीही विचार केला नाही की मी देशासाठी खेळलेला हा खेळ आहे, जेव्हा मी राष्ट्रीय संघासह प्रशिक्षण घेतो तेव्हा मला त्याचा आनंद मिळतो. सुनील छेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img