2.5 C
New York

Weather Update : राज्यात पुढील 2 दिवस उकाडा वाढणार

Published:

देशामध्ये एकीकडे भारतीय हवामान विभागाने ( IMD) एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देशात मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यात ( Maharashtra ) मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट ( Weather Update) असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी दोन दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर, मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे तर मुंबईची दशा फारच विकट झाली आहे.

Weather Update राज्यात उष्णतेची लाट कायम

यामध्ये पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनबद्दल मोठी अपडेट समोर, या तारखेला पडणार पाऊस

Weather Update मुंबईत काय होणार?

तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. गुरूवारीही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा लागणार, हे निश्चित आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यापुढे 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. परंतु महाराष्ट्रात मान्सून येईपर्यंत लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी बसायला लागल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

दरम्यान यावर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला आहे.(Weather updates) जागतिक स्तरावर एल-निनो फॅक्टरमुळे एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. यामुळेच नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण राहिला. यासह युरोपमध्ये सर्वात उष्ण असलेल्या महिन्यांमध्ये एप्रिल महिन्यांचे दुसऱ्या क्रमांकावर नोंद करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img