3.6 C
New York

Ghatkopar Hoarding : भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Published:

मुंबई

मुंबईत सोमवारी संध्याकाळी घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. तो 3 दिवसांपासून फरार होता. मुंबई पोलिसांच्या क्राईम (Mumbai Crime Branch) शाखेनं त्याला अटक केलीय.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनामध्ये 50 तास उलटून गेले आहेत. अजून देखील  NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा,अग्निशमन  दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं असून 50 टक्के काम बाकी आहे. 

ढिगाऱ्याखालून 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने बाहेर काढल्या आहेत. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक याठिकाणी असे एकूण 3 जण अडकले असून त्यांना जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम NDRF जवानांच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img