शंकर जाधव, डोंबिवली
शहरात लोकसंख्या झपाटयाने वाढत आहेत परिणामी डोंबिवली (Dombivli) पूर्व भागात लोकसंख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक गरजा वाढल्या पण येथे लागणाऱ्या भौतिक साधनाची आवश्यकता ओळखून शिक्षणतज्ञ डॉ.ओमन डेव्हिड यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलात डॉ.डेव्हिड्स कॉलेज (Dr. David College) ऑफ हायर एज्युकेशन माध्यमातून 2024-25 पासून बीए, बीएससी, बीकॉम पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे.
मुंबई विद्यापीठ, युजीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्धारित केलेल्या नियमानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा येथे मिळणार आहेत. विशेष म्हणजे येथे वाचनालय, क्रीडांगण, कँटीन, जिमखाना, वॉश रूम, टॉयलेट, लॅब आदींचा समावेश आहे. तसेच विध्यार्थ्यांच्या सुरक्षेतेची काळजी घेण्यासाठी कॅम्पस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्थेबरोबर सुरक्षा रक्षक आहेत.
अद्यावत महाविद्यालयामुळे विद्यार्थाना डोंबिवली बाहेर शिक्षणासाठी जाण्याची गरज भासणार नाही. आता यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च, त्रास व वेळ हि वाचणार आहे. डोंबिवलीतच केंद्र स्थानी असल्याने सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांचे लाभ होणार आहे. येथे दर्जेदार आधुनिक सुविधा व सुरेख डिझाइन केलेली भव्य महाविद्यालय इमारत असून दिग्गज शिक्षणतज्ञ डॉ. ओमन डेव्हिड यांनी याचे संचालन केले आहे. तसेच ट्रिनिटी एज्युकेशनल ट्रस्टच्या होली एंजल्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा गेल्या १८ वर्षांपासून निकाल १०० टक्के लागत आहे. संचालक डॉ. ओमेन डेव्हिड व प्राचार्य बिजॉय ओमेन संचालित होली एंजल्स स्कूल, डोंबिवली (पूर्व) शाळेचा यावर्षीही सी.बी.एस.ई दहावी परीक्षा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम तीन क्रमांकात श्रेयस श्याम अय्यर (98.80) आर्या केदार देवधर (96.80) हितांशू राजेश हातिसकर (95.80) गुण मिळविले असून 90 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. डॉ. ओमेन डेव्हिड, प्राचार्य बिजॉय ओमेन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.