26 C
New York

Narendra Modi : ‘त्या’ दुर्घटनेनंतर मोदींचे कटआऊट हटवले

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदींची Narendra Modi  शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्कमधील नरेंद्र मोदींची सभा होण्यापूर्वी निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केलीय. शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले मोदींचे मोठे कटआऊट आयोगानं हटवले आहेत. शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले महायुतीचे सर्व अनधिकृत बॅनर्स निवडणूक आयोगाने हटवलेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे बॅनर काढण्याची कारवाई आयोगानं केली आहे.

मोदींचा आत्मविश्वास ढळलाय – शरद पवार

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातील सर्व मतदारसंघांचा समावेश आहे. अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य या टप्प्यात पणाला लागलंय. त्यामुळे प्रचार देखील शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (17) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात सभा होणार आहे. महायुतीच्या प्रचाराची सांगता या सभेच्या माध्यमातून होणार असून त्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img