देशात दौऱ्या करण्याआधी तुम्ही तिहार जेलमध्ये जाण्याची तयारी करा, या शब्दांत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Mourya) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सुनावलं. दरम्यान, भाजप सत्तेत आल्यास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना हटवणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यावर मौर्य यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीयं. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्वच नेत्यांनी कंबर कसलीयं. त्यातच आता अरविंद केजरीवाल यांनी भाजपला डिवचलंय.
Arvind Kejriwal काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
तिहार जेलमधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणार आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाहा पंतप्रधान बनण्यास इच्छूक असल्याचाही दावा केजरीवाल यांनी केलायं.
राऊतांच्या आरोपानंतर झाली मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी
दरम्यान, देशात दौरा करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये जाण्याची तयारी करावी. कारण संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या सोबत आहे. इंडिया आघाडी गठबंधन नाही तर ठगबंधन असून अखिलेश यादव 2014, 17. 11 साली काय करत होते. अखिलेश यादव आणि राहुल गांधी निवडणूक हरलेले आहेत. देशात 60 वर्ष काँग्रेसची सत्ता होतीत तेव्हा लोकं उपाशी मरत होते तेव्हा त्यांना आठवण झाली नाही. जेव्हा एका गरीब देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याने लोकांची चुली शांत केल्या तेव्हा त्यांनी दावा केला की काँग्रेस 5 किलोऐवजी 10 अन्नधान्य देणार आहे, अशी टीका केशव मौर्य यांनी केलीयं.