26.6 C
New York

Accident: इंस्टाग्राम लाईव्ह बेतलं जीवावर; तरुणांनी गमावला जीव

Published:

आजकाल वाढत्या सोशल मीडिया फेममुळे सर्वांचं फेमस व्हायचं असतं. सोशल मीडियावर देखील कोणत्या ना कोणत्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. या हव्यासापायी गुजरातमध्ये दोन तरुणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर (Ahmedabad-Mumbai Highway) हा अपघात (Accident) घडला असून गाडीत ५ तरुण होते. त्यातील तीन गंभीर जखमी असून दोघांचा मृत्यू झाला. मारुती सुझुकी ब्रेझामधून अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने जात असताना इन्स्ट्राग्राम लाईव्ह सुरु असल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. सदर तरुण हे २२ ते २७ वयोगटातील असून ते १६० किलोमीटरच्या वेगाने प्रवास करत होते.


ही दुःखद घटना २ मे रोजी घडली असून आता व्हिडिओ समोर आला आहे. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर मारुती सुझुकी ब्रेझा गाडीने प्रवास करत असताना पाच जणांचा भीषण अपघात झाला. पहाटे 3.30 ते 4.30 च्या दरम्यान ही घटना घडली. मात्र त्यांनी इंस्टाग्राम लाईव्ह सुरु केले होते, ज्यामुळे हा सर्व प्रकार कैद झाला आहे.


कारमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक वाजत होते, शिवाय कार 160 किमी प्रतितास वेगाने असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ह्यातील एक मुलगा, “कार कशी चालवावी हे पहा” असं म्हणतो आणि कॅमेरा SUV च्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे वळतो. तर तिथे १६० किलोमीटर वेग दिसतो. पुढे या गाडीचा अपघात झाला. ज्यात तिघे जखमी झाली असून, दोन तरुणांचा बळी गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img