23.1 C
New York

Weather Forecast: काय असणार हवामान? उन्ह की पाऊस?

Published:

(Weather Forecast) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अशातच अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेगर्जना, वीजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच ५० ते ६० किलोमीटर तशी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात एका भागात पाऊसाचा इशारा असतानाच कोकणातील ठाणे व मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

बचावकार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (१५ मे) रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला. अंदाजे १९ मे रोजी मॉन्सूनचे आगमन दक्षिण अंदमान समुद्र व दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तसेच निकोबार बेटावर आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याची एक द्रोणीय रेषा, आग्नेय अरबी समुद्र व केरळच्या लगतच्या भागातून मराठवाड्यापर्यंत जात आहे. यामुळे पुढील ६-७ दिवसात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे वाऱ्याची एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ लगतच्या भागावर तयार झाली आहे.

राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी माध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img