21 C
New York

Uddhav Thackeray : इलेक्ट्रोल बॉंड घोटाळा जगात सर्वात मोठा- ठाकरे

Published:

नाशिक

मोदींनी आपली वंशावळ दाखवावी, मी माझी वंशावळ दाखवितो. माझ्या आजोबांनी काय काम केले ते पाहूयात आणि मोदींच्या (PM Narendra Modi) वंशजांनी काय सामाजिक काम केले ते पाहूयात असे आव्हान शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधानांना नाशिक (Nashik) येथील सभेत दिला.

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतींनी इलेक्ट्रोल बॉंड घोटाळा जगातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. तुम्ही खा..खा खायचे. आणि कोरोनाकाळात आम्ही जनतेला वाचविले, मला एक क्रमांकाचा मुख्यमंत्री केले. आमच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करता अशा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी नाशिक सभेत केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img