सोलापूर
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि लोकसभा उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे ही बाप लेकीची जोडी भाजपात प्रवेश करणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांची बोलताना म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सोलापूरच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. तुम्हीच निर्णय करायचा आहे की भाजपाला जिंकून द्यायचे की हरवायचे? अनेक मौलवी आज काँग्रेस काँग्रेस करत आहेत. त्यांनी काँग्रेसला विचारावे की देशभरात एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपाचीजी लाईन आहे त्यावरच काँग्रेस जात आहे, असे आंबेडकरांकडून यावेळी सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून राज्यात 20 मे ला पाचव्या टप्प्यात म्हणजेच 2024 ची शेवटची लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मुंबई, नाशिक, धुळे, कल्याण, ठाणे या ठिकाणी प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.