अभिनेत्री आणि इंटिरियर डिझाईनर शमिता शेट्टी (Shamita Shetty) सध्या एका गंभीर आजाराशी सामना करत आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने या आजाराशी लढत असल्याची बातमी दिली. तिला एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार झाला असून नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. शमिता काही काळापासून एंडोमेट्रिओसिस आजाराने त्रस्त आहे.
शमिताला आजाराबाबत माहिती मिळताच त्वरित रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले. नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. या व्हिडिओमध्ये शमिताने एंडोमेट्रिओसिसची (Endometriosis) माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये शमिता म्हणाली, “एंडोमेट्रिओसिस म्हणजे ही अशी स्थिती आहे जिथे गर्भाशयाच्या बाहेर ऊतक वाढतात.” शमिताने स्त्रियांना आवाहन केले की “स्त्रियांना स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे.अनेकांना अशा आरोग्य समस्यांबद्दल माहिती नसते ज्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो. सर्व स्त्रिया, कृपया एंडोमेट्रिओसिस गुगलवर सर्च करा. आपल्याला समस्या काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे.”
बेशुद्ध अवस्थेत राखी सावंत रुग्णालयात… नेमकं काय झालं राखीला ?
मंगळवारी शमिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हि व्हिडिओ पोस्ट केली. या व्हिडिओत शमिता हॉस्पिटलच्या बेडवर बसून बोलत आहे. ज्यात शमिता तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत बोलत आहे. व्हिडिओच्या सुरवातीला शमिता हॉस्पिटलच्या बेडवर बसून आणि तिने सर्जिकल कॅप घातली आहे. दुसरीकडे, शिल्पा (Shilpa Shetty) तिच्या धाकट्या बहिणीला शमिताला विचारते ‘क्या हुआ’. शमिता पुढे सांगते की ती एंडोमेट्रिओसिसशी झुंजत आहे आणि नंतर स्त्रियांना स्वतःची काळजी घेण्याची विनंती करते कारण बहुतेक स्त्रिया अशा आजारांना सामोरे जातात परंतु त्यांना माहिती नसते. शमिताच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच प्रकृतीची काळजी घ्यायची विनंती केली आहे. चाहत्यांसोबतच सहकलाकारांकडून देखील शमिताच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.